Monday, September 24, 2018

महात्मा फुले महामंडळातर्फे लाभार्थ्यांना कर्ज वितरण


            सोलापूर दि. 24 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने पाच लाभार्थ्याना कर्ज वितरण करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष राजा ऊर्फ सुधाकर सरवदे  यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले.
            महामंडळाच्या एनएसएफडीसी मुदती कर्ज योजनेअंतर्गत तीन आणि बीज भांडवल योजने अंतर्गत दोन तर बीज भांडवल योजनेअंतर्गत दोन लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले.      यावेळी जिल्हा व्यवस्थापक एम.एस.माने, सहाय्यक लेखाधिकारी ए. एन. खैरमोडे, एन. डी. जाधव, एस.एस.काबंळे आदी उपस्थित होते.
राजपाल शिवाजी नागटिळक रा. हनुमान नगर भवानी पेठ सोलापूर यांना मंगल भांडार व्यवसायाकरीता 1,90,000, सचिन संभाजी बनसोडे भवानीपेठ मुंकंद नगर सोलापूर यांना किराणा दुकानसाठी 1,90,000, रवि शरणाप्पा कांबळे रा. न्यु बुधवार पेठ सोलापूरयांना  किराणा दुकानासाठी 1,90,000 तसेच बीजभांडवल योजनेअंतर्गत श्रीमंत लक्ष्मण लांडगे मु. पो हिंगरगी ता. सांगोला जि. सोलापूरयांना  शेळीपालनासाठी 40,000, अक्षय अनिल लंकेश्वर रा. जुळे सोलापूर यांना  शेळीपालनासाठी 40,000 धनादेशाचे वाटप केले.
******


No comments:

Post a Comment