Wednesday, September 19, 2018

विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक माहितीचा खजाना मुख्याध्यापिका शहिनाज शेख



           पंढरपूर, दि. 18 :- शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालाच्या वतीने  प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यमध्ये शासकीय योजनांसह स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक माहितीचा खजाना विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावण्यासाठी उपयुक्त असल्याचे मत लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शहिनाज शेख यांनी  व्यक्त केले .
            जिल्हा माहिती कार्यालय सोलापूरच्या वतीने अकलूज येथील लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत आयोजित लोकराज्य मासिक मेळाव्यास मुख्याध्यापक संजय गळीतकर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, महिती सहाय्यक एकनाथ पोवार, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे, इक्बाल भाईजान, भाऊसाहेब चोरमले, शिवाजी पालवे आदी उपस्थित होते.
            शासनामार्फत सर्वसामान्यांसाठी  लोकल्याणकारी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती लोकराज्य मासिकात येत असते. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या  विविध शिष्यवृत्तीची माहिती असल्याने विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक दिशादर्शकच आहे. 
            ज्येष्ठ पत्रकार कुंभार यांनी लोकराज्यमध्ये येणारे दुर्मिळ लेख विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारे आहेत, असे सांगितले. स्पर्धा परीक्षेसाठी अचुक माहिती देणाऱ्या लोकराज्य मासिकाचे विद्यार्थ्यानी नियमित वाचन करावे. माहिती विभागामार्फत राबविण्यात येत असलेला लोकराज्य वाचक अभियान उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
            माहिती सहायक एकनाथ पोवार यांनी विद्यार्थ्याना लोकराज्य मासिकाबाबत माहिती दिली. मासिकाची वार्षिक वर्गणी 100 रुपये असून, विद्यार्थ्यांनी मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
00000


No comments:

Post a Comment