Wednesday, September 19, 2018

लोकराज्य मधील माहिती सर्वच घटकांना उपयुक्त मुख्याध्यापक संजय गळीतकर



     पंढरपूर, दि. 18 :- लोकाराज्य मासिकातून मिळणारी माहिती समाजातील सर्वच घटकांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक संजय गळीतकर लोकराज्य वाचक मेळाव्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्श करताना केले
             जिल्हा माहिती कार्यालय सोलापूरच्या वतीने अकलूज येथील महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रशालेत आयोजित लोकराज्य मासिक मेळाव्यास लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शहिनाज मकबूल शेख, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, महिती सहाय्यक एकनाथ पोवार, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे, इक्बाल भाईजान, भाऊसाहेब चोरमले, शिवाजी पालवे आदी उपस्थित होते.
            शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालाच्या वतीने लोकराज्य मासिक प्रकाशित करण्यात येते. मासिकात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्यमध्ये  शासच्या विविध योजना, शैक्षणिक माहिती, शेतक-यांसाठी व नागरीकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती या बरोबरच अन्य विषयांची सर्वसमावेशक अशी माहिती देण्यात येत आहे. मासिकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात पोहचण्यास मदत होत असल्याने  प्रत्येकाने मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.     
प्रारंभी एकनाथ पोवार यांनी लोकराज्य मासिकाबाबत माहिती देवून मासिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. मासिकाची वार्षिक वर्गणी 100 रुपये असून, विद्यार्थ्यांनी मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
            लोकराज्य वाचक मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वाचनही केले.


                                                             00000


No comments:

Post a Comment