Monday, September 24, 2018

थकीत व्याज रक्केवरील सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन


सोलापूर दि.24 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सोलापूर कार्यालयामार्फत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्याना थकीत व्याज रक्कमेवर 31 मार्च 2019 पर्यंत      2 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
            जिल्हा कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या कर्जातील 918 लाभार्थ्याकडे 4 कोटी 58 लाख 5 हजार इतकी  थकीत रक्कम आहे. थकीत रक्कम वसुल करण्याबाबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत थकीत लाभार्थी, त्यांचे जामिनदार हमीपत्र/पगारपत्र धारकांचे वेतनातून कपात, गहाण खत (कर्ज बोजा नोंद उतारे) इत्यादीचे आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र राज्य जमीन महसूल कायदा 1966 मधीत तरतुदीनुसार आर.आर. सी अंतर्गत कार्यवाही करण्याचे  विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या सचिवांनी कळविले आहे.
थकीत रक्कम वसुल करण्याबाबत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत कारवाई करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. कायदेशीर कारवाई टाळयासाठी जिल्ह्यातील थकीत लाभार्थीनी व्याज सवलतीचा लाभ घेऊन थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरुन कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे,असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक भीमराव मुदगल यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment