Friday, September 21, 2018

‘लोकराज्य’ स्पर्धा परिक्षेसाठी उपुयक्त - राही सरनोबत




पुणे दि. 21 : राज्य शासनाचे मुखपत्र असणारे ‘लोकराज्य’ मासिक स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत आंतरराष्ट्रीय खेळाडू राही सरनोबतयांनी आज व्यक्त केले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राही सरनोबतबोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड उपस्थित होते.
राही सरनोबतम्हणाल्या, लोकराज्य मासिक हे अत्यंत दर्जेदार असून या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त आहे. याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. अत्यंत अल्प किमतीत अतिशय सुंदर माहिती या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचते. 

*****





No comments:

Post a Comment