Tuesday, September 25, 2018

महामेट्रोच्या कामाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा


पुणे दि. 25: पुणे महामेट्रोच्या कामांचा आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज पार पडली. या बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी कामाचा आढावा घेतला.
            या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, पीएमपीएलच्या चेअरमन नयना गुंडे, महामेट्रो पुणेचे रामनाथ सुब्रमण्यम, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, पुणे महामेट्रोचे जॉईंट जनरल मॅनेजर प्रल्हाद कचरे, महामेट्रोचे बी. एस. पऱ्हाड, एसआरएचे संजय रांजणे, उपजिल्हाधिकारी वैशाली उंटावल, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार, यामिनी जोशी, पोलीस निरीक्षक विजय बाजारे उपस्थित होते.
            या प्रकल्पासाठी एकूण 42 हेक्टर जमीनीची आवश्यकता असून त्यापैकी 38.30 हेक्टर जमीन शासकीय तर उर्वरीत 3.70 हेक्टर जमीन खाजगी आहे. या जमिनीच्या संपादन व हस्तांतरणाबाबत चर्चा झाली. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या 685 कुटुंब आणि दुकानांच्या पुनर्वसनाबात चर्चा करण्यात आली.  त्याच बरोबर काही भागात पुरातत्व विभागाच्या नाहरकत दाखला मिळणे आवश्यक आहे, त्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच मेट्रोच्या कामावेळी शिवाजीनगर बसस्थानाकाच्या तात्पुरर्त्या स्थलांतरासाठी जागा शोधणे, तसेच स्वारगेट मल्टी ट्रान्सपोर्ट हबच्या बांधकामाच्यावेळी स्वारगेट बसस्थानकाच्या तात्पुर्त्या स्थलांतरासाठी जागा शोधण्यावर चर्चा करण्यात आली.
            महामेट्रोचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
*****

No comments:

Post a Comment