Saturday, July 30, 2016

1 ते 15 ऑगस्ट पशुधन विमा पंधरवडा -डॉ.विनोद पवार


          सातारा दि.30 (जि.मा.का.):शासनाच्या पशुधन विमा योजनेतून पशुधन विमा उतरविणेसाठी जिल्हयात 1 ते 15 ऑगस्ट,2016 या दरम्यान पशुधन विमा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधुन सदर योजनेचा लाभ घ्यावा पल्या बहुमूल्य पशुधनास विमा कवच द्यावे असे, आवाहन पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.
शासनाच्या वतीने पशुधनासाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. याकरिता दारिद्रय रेषेखालील तसेच अनुसूचीत जाती-जमातीतील पशुपालकांसाठी विम्याच्या रकमेत 70 टक्के तर इतरांना 50 टक्के सवलत मिळणार आहे. जनावरांची किंमत ही त्यांच्या रोजच्या दुधावरुन ठरविण्यात येणार आहे. गाईची किंमत ठरविताना दुधाचा दर प्रती लिटर 3000 तर म्हशीची किंमत ठरविताना दुधाचा दर प्रती लिटर 4000 धरण्यायेणार आहे. जनावरांच्या किंमतीच्या 2.45 टक्के रक्कम भरल्यास एक वर्षाचा तर किंमतीच्या 6.40 टक्के रक्कम भरुन तीन वर्षाचा विमा उतरविता येणार आहे.
विम्यासाठी केंद्रशासन अनुदान देणार आहे. न्यु इंडिया इन्शूरन्स कंपनीकडे विमा रक्कम भरावयाची असून जिल्हयात एकूण 130338 पशुधन असून त्यामध्ये शेळी 309011, मेंढी 264221, गायवर्गीय 377262 म्हैसवर्गीय 352844 यांचा समावेश आहे. प्रत्येक लाभार्थीला पाच मोठया जनावरांचा विमा उतरविता येईल. जिल्हयात एकूण 193 पशुवैद्यकिय दवाखाने असून त्यांना 5000 जनावरांचा विमा उतरविण्याचे उद्दिष्ट देणेत आलेले आहे, असेही डॉ.विनोद पवार यांनी कळविले आहे.
00000


No comments:

Post a Comment