Saturday, July 30, 2016

जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभाग सुसज्जपणे कार्यान्वीत

                  
सातारा दि.30 (जि.मा.का.): जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. शवविच्छेदनाकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांनी हा विभाग सुसज्जपणे कार्यान्वीत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी दिली.
रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी येणाऱ्या शवाचा पोलीसांकडून इक्वेट पंचनामा करण्यात येतो. शवाचा पंचनामा होण्यास पोलीसांना वेळ लागतो व त्यानंतर पोलीसांकडून पंचनामा प्राप्त होताच तात्काळ शवाचे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीतच शवविच्छेदन करण्यात येते. शवविच्छेदन करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब रुग्णालयामार्फत होत नाही. याबाबत रुग्णालयाकडे कोणत्याही नातेवाईकाने शवविच्छेदन वेळेत केलेले नाही अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. या रुग्णालयामध्ये प्रेताची नेहण्यासाठी व आणण्यासाठी शववाहिका उपलब्ध नाही तसेच रुग्णवाहिकेचा उपयोग फक्त रुग्णांसाठी तातडीची सेवा देण्यासाठीच करण्यात येतो.
                जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व रुग्णालयातील अधिकाऱ्यांना तात्काळ शवविच्छेन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. आता पुन्हा याबाबतीत सक्त आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोई यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment