Monday, July 18, 2016

ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती


पुणे, 19  : ध्वनी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी प्रदूषण (नियमन नियंत्रण) नियम-2000 प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने प्राधिकरणे निश्चित केलेली आहेत. त्याचप्रमाणे गृह विभागाच्या डीआयएस 0910/प्र.क्र.434/विशा-1,, दिनांक 14 जुलै, 2015  अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना ध्वनी प्रदूषण नियंत्रणाकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.
जनतेच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या तक्रारी प्राप्त करुन घेण्यासाठी तसेच उत्सवाच्या वेळी आणि  पूर्वपरवानगीने आयोजित केलेल्या करमणूक कार्यक्रमाच्यावेळी अचानक भेटी देवुन ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहेध्वनी प्रदूषणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास तातडीने संबधित अधिका-यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विशेष शाखेचे  पोलीस निरीक्ष्ाक एम. बी. पाटील यांनी पत्रकान्वये  केले आहे. प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास पोलीस अधीक्षक ग्रामीण क्षेत्रातील उप विभागीय पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांना प्रतिसाद दिल्यास अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे बारामती, जि.पुणे यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
      अधिक माहितीसाठी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे कार्यालय, चव्हाण नगर, पाषाण रोड, पुणे 411008 येथे  संपर्क साधावा.   कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 020-25657535 फॅक्स क्र. 020-25674641 मेल आयडी sp.pune.r@mahapolice.gov.in असा आहे, असे विशेष शाखेचे  पोलीस निरीक्ष्ाक एम. बी. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000 

No comments:

Post a Comment