Saturday, July 23, 2016

रा.चि. ढेरे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून सात्वंन











पुणे, दि. २३ (विमाका): सुप्रसिद्ध संशोधक, विचारवंत दिवंगत रा. चि. ढेरे यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले.
            रा.चि. ढेरे यांच्या पत्नी इंदुबाला ढेरे यांची विचारपूस करून आणि त्यांची कन्या अरुणा ढेरे, प्रमिला ढेरे, वर्षा गजेंद्र गडकर, मुलगा मिलिंद ढेरे यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांनी रा. चि. ढेरे यांच्या ग्रंथ संपदेची माहिती घेऊन काही पुस्तकांचे अवलोकनही केले. तसेच रा. चि. ढेरे यांनी आयुष्यभर जमवलेल्या आणि वापरलेल्या भव्य स्वरूपातील अशा ग्रंथ संपदेची पाहणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
            हा ग्रंथ ठेवा जपण्यासाठी मदतीची अपेक्षा श्रीमती अरुणा ढेरे यांनी केली. तसेच ‘विठ्ठलावरील रा. चि. ढेरे यांनी लिहिलेला ग्रंथही श्रीमती अरुणा ढेरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना भेट दिला.
            यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर, आमदार माधुरी मिसाळ, किरण शेलार आदी उपस्थित होते.
****


No comments:

Post a Comment