Thursday, July 21, 2016

खाजगी बस वाहतुकदार, वाहनचालकांची कार्यशाळा संपन्न


                सातारा, दि.21 (जिमाका):उप प्रादेशिक परिवहन, कार्यालय सातारा व कराड तसेच महाराष्ट्र खाजगी बस वाहतूक संघटना यांचेतर्फे हॉटेल प्रिती एक्झिक्युटिव्ह, अजंठा चौक, सातारा येथे दिनांक 20 जुलै 2016 रोजी खाजगी बस वाहतूकदार व वाहनचालकांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
                या कार्यशाळेत  सातारचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय  धायगुडे, कराडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीफन अल्वारीस , सहाय्यक  प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग, प्रसन्ना पटवर्धन, प्रकाश गवळी, बाबा शिंदे, दयानंद नाटकर, महेश लुले, बाबासाहेब खेडकर आदी यावेळी उपस्थित होते.
                या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. धायगुडे म्हणाले, वाहतूकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होईल. वाहनचालकांच्या शारिरीक व मानसिक आरोग्याची काळजी वाहन मालकांनी घेणे आवश्यक आहे. यावेळी  योगेश बाग, सी.आय.आर.टी. पुणेचे श्री.सस्ते, युनायटेड इंडिया कंपनीचे श्री.कुंभार,श्री.पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.रफिक शेख यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment