Wednesday, July 20, 2016

अपंग व्यक्ती व अपंगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी राज्य पुरस्कारासाठी अर्ज करावेत


                सातारा, दि. 20 (जि.मा.का): अपंग व्यक्ती व अपंगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी राज्य पुरस्कार 2016 साठी दि.30 जुलै 2016 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन साळे यांनी केले आहे.
                अपंगत व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कार 2016 साठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. उत्कृष्ट कर्मचारी, स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्तक संस्था मध्ये स्वयंउद्योग करणाऱ्या अपंग व्यक्ती किंवा अपंग कर्मचारी यांना उत्कृष्ट अपंग कर्मचारी, स्वयंउद्योजक पुरस्कार देण्यात येतो. 
                पुरस्कारासाठी अपंग व्यक्ती अपंगासाठी कार्य करणाऱ्या इच्छुक संस्थांनी परिपूर्ण अर्ज 4 प्रतीत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा येथे 30 जुलै 2016 पर्यंत सादर करावेत. तसेच केलेल्या कार्याविषयीची संक्षिप्त माहिती 150 ते 200 शब्दांमध्ये इंग्रजीत तयार करुन अर्जास जोडावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी किंवा WWW.DISABILITYAFFAIRS.GOV.IN या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही श्री. साळे यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment