Sunday, July 10, 2016

संत तुकाराम महाराज पालखीचे टाळ - मृदंगाच्या गजरात जिल्ह्यात स्वागत



सोलापूर दि.10 – जगदगुरु संत तुकाराम महाराज याची पालखी लाखो वारक-यांसह टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात आज इंदापूर तालुकयातील सराटी येथून सकाळी 8.30 च्या सुमारास मेाठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात  सोलापूर जिल्ह्यात दाखल  झाली.
             पालखीचे स्वागत पालकमंत्री   विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख,  जिल्हाधिकार रणजित कुमार यांनी केले. याप्रसंगी आमदार हनुमंत डोळस, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, जिल्हा पोलीस प्रमुख एस. विरेश प्रभु, आदि मान्यवर उपस्थ‍ित होते.
            देहु संस्थान तर्फे यावेळी पालकमंत्री, तसेच सहकारमंत्री  यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पालखी रथाचे सारथ्य करण्याची संधी देण्यात आली. या सोहळ्यानंतर अकलुज येथील गांधी चौकामध्ये माढ्याचे  खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते  स्वागत करण्यात आले.
            या स्वागतानंतर सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात  पालखीचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण सपन्न झाले.  झेंडेकरी हंडा तुळस या पालखीचे मुळ चोपदारांचे वंशज नामदेव गिरात, विणेकरी टाळकरी- पकवाज यांनी गोल रिंगणात धावत प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वाने रिंगणात गोल धावत फेरी पूर्ण केली. त्याच्या या फेरी नंतर वारक-यांमध्ये चैतन्याची लहर आली. हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी हजारो अकलुजकरांनी  आपली हजेरी लावली.
यावेळी जयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्यासह  संपूर्ण मोहिते कुटुंबियातील इतर सदस्य, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,  तसेच  संस्थानचे  अध्यक्ष नारायण महाराज, पालखी सोहळा प्रमुख अशोक मोरे, अभिजित मोरे महाराज, बापूसाहेब मोरे महाराज, जालींदर विश्वजीत मोरे महाराज, सुनिल मोरे महाराज आदी उपस्थित होते.

                                000000

No comments:

Post a Comment