Friday, July 22, 2016

आषाढी काळात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे 192 जणांवर कारवाई


सोलापूर दि. 22 :-  आषाढी वारीच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने  554 प्रकारच्या विविध दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 192 दुकानदार दोषी आढळल्याने त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले. यात्रा कालावधीत 14 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. वारी दरम्यान 12 गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात येवून सुमारे  85 हजार 616 रुपये किंमतीचा साठा, 503 लिटर भेसळ दुध तसेच 550 किलो क्रीम, सुमारे 3 टन पेढा, इतर 1 टन अन्न पदार्थ  व 68 हजार 500 रुपये किंमतीचा शितपेयाचा साठाही यावेळी जप्त करण्यात आला.
00000

No comments:

Post a Comment