Saturday, July 30, 2016

आत्मामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनातंर्गत प्रशिक्षण


            सातारा दि.30 (जि.मा.का.):मौजे कुसवडे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत आले पीक परिसंवाद व पाणी व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न झाले.
            या प्रशिक्षणास आत्माचे कृषी उपसंचालक विकास बंडगर, मंडल कृषी अधिकारी अजिंक्य पवार, कृषी पर्यवेक्षक अर्जुन पवार, कृषी सहाय्यक अंकुश सोनावले, नितीन जाधव, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश नलवडे, सुप्रिया जाधव व कुसवडे आदी उपस्थित होते.
            या कार्यक्रमामध्ये आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. बंडगर यांनी आत्मा मध्ये कोणकोणते नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात आले याची सविस्तर माहिती दिली. शेतक-यांना नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज असल्यास किंवा अभ्यास दौरा आयोजीत करावयाचा असल्यास त्यांचे नियोजन आत्मा मार्फत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
            कृषी सहाय्यक  श्री. सेानावले यांनी आले पिकावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आले किड व रोग नियत्रंणासाठी कंदमाशी ,कंदकुज एकात्मिक पध्दतीने कशी नियत्रंण करणे त्यांचे मार्गदर्शन केले. कंदकुज नियत्रंणसाठी सुडोमोनोस, हुमणी,कंदमाशी अळी यांच्या नियत्रंणासाठी मेटोरायझिंयम, पानाच्या करपा नियत्रंणासाठी गोमूत्र लसुण अर्क फवारणी, कडुलिंब अर्क, कंदमाशी नियत्रंणासाठी पिवळे चिकट सापळे, फळमाशी सापळे वापरणे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नितीन जाधव यांनी ठिंबक सिंचन देखभाल कशी करावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ठिंबक कोणते बसवावे, तसेच विद्राव्य खताविषयी माहिती दिली.
            कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक. गणेश नलवडे यांनी केले. तर आभार आनंदराव महाडीक यांनी मानले. यावेळी कृषी अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment