Thursday, July 7, 2016

संत गजानन महाराज यांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन


सोलापूर दि.7 :- शेगावचे संत श्री गजानन महाराज पालखीचे आज दुपारी टाळमृदूंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सोलापूर जिल्ह्यात उळे गांव येथे आगमन झाले. फडफडणा-या भगव्या पताका, टाळमृदूगांचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संत श्री गजानन महाराज पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.संत श्री गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख , माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे, दक्षिण सोलापूरचे सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, उपसभापती आप्पा दणके, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसिलदार रघुनाथ पोटे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश हसापुरे आदीसह विविध पदाधिकारी, मान्यवर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000









No comments:

Post a Comment