Tuesday, July 12, 2016

दर्शन मंडपातील दुसऱ्या मजल्यावर वैद्यकीय पथक कार्यरत



पंढरपूर दिनांक 12 :-  दर्शन मंडपातील दुसऱ्या मजल्यावर वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे डॉक्टर, परिचारिका, व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
            दर्शन मंडपात भारत सेवाश्रम संघाचे वैद्यकीय पथकही कार्यरत असून या पथकामार्फत आज सुमारे 300 आणि पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकामार्फत सुमारे 500 वारकरी भाविकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  तसेच मंदिर परिसरात प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांसह  रेस्क्यू व्हॅनही कार्यरत ठेवण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment