Monday, July 25, 2016

मिनी ट्रॅक्टर व उप साधनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन



 पुणे, 25 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची  उपसाधने यांचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
            अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गट पुरुष किवा महिलांचा असावा. स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे ८० टक्के अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत. त्यासाठी संबंधित सदस्यांचे सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला, रहिवासी दाखला,आधार कार्ड इ. कागदपत्रे स्वसाक्षांकित केलेले असावेत व इतर २०% कोणत्याही जातीतील चालतील. त्यांचेही कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
            मिनी ट्रक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3,50,000/- इतकी असून स्वयंसहायता बचत गटाने वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के स्वहीस्सा भरल्यानंतर (डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात) 90 टक्के म्हणजे (कमाल रुपये 3.15 लाख ) शासकीय अनुदान (वस्तूच्या स्वरुपातमहिंद्रा कंपनीचा मिनी ट्रक्टर, ट्रॉली, रोटावेटर) अनुज्ञेय  राहील. स्वयंसहायता बचत गटाची संख्या प्राप्त झालेल्या  उद्धीष्टापेक्षा जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने वाटप केले जाईल. वैयक्तिक पॉवर ट्रीलर योजना बंद करणेत येऊन उपरोक्त्‍ योजना सन 2012-13 मध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेली आहे  याची सर्वांनी नोंद घ्यावी. अनुसूचित जातीतील व नवबौद्ध घटकातील इच्छुक स्वयंसहायता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे जिल्हा ,पुणे यांचे नावे मिनी ट्रक्टर व त्याची उपसाधने मिळणेबाबतचा प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव सादर करणेसाठीचा अर्ज व प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रांची यादी व सादर करावयाचा प्रतिज्ञापत्राचा नमुना सहायक आयुक्त समाजकल्याण, स्वारगेट पी.एम.टी. इमारत, पुणे यांचे कार्यालयात (अनु.जाती उपयोजना विभाग) विनामूल्य मिळतील.  अर्जाची छायांकित प्रत सुद्धा बचत गट वापरू शकतील. अधीक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पी.एम.टी.इमारत, कामगार न्यायालयाच्या वर, दुसरा मजला स्वारगेट, पुणे-42 येथे साधावा.

0000

No comments:

Post a Comment