Saturday, July 30, 2016

पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तीक लाभाच्या योजना


    सातारा दि.30 (जि.मा.का.):जिल्हा परिषद सातारा , पशुसंवर्धन  विभागामार्फत  पशुपालकांसाठी  वैयक्तीक  लाभाच्या  विविध  योजना  राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.विनोद पवार यांनी केले आहे.
             योजनांची  माहिती व  लाभार्थी निवडीचे  निकष  पुढीलप्रमाणे- विशेष  घटक योजना  सन २०१६-१७   अनु .  जाती  व नवबौध्द लाभार्थीना  ७५  टक्के अनुदानावर  दुधाळ  जनावरांचे  गट  वाटप  (प्रत्येकी २ गाई अथवा  म्हैशीचे  वाटप ), अनु. जाती व नवबौध्द  लाभार्थीना  ७५  टक्के  अनुदानावर शेळी गट वाटप ( १० शेळ्या  + १  बोकड )अनु . जाती  व नवबौध्द  लाभार्थी कडील  जनावरांना   भाकड  कालावधीसाठी  १००  टक्के  अनुदानावर खाघ वाटप  योजना.                            
            या योजनांसाठी  लाभार्थीनी   करावयाच्या  अर्जाचा  नमुना  पशुधन अधिकारी  विस्तार, पंचायत समिती  यांचेकडे  उपलब्ध  असून  त्यासोबत   लाभार्थीनी  स्वत: चे  फोटो  व  ओळखपत्राची  सत्य प्रत, जातीचा दाखला ,  दारिदयरेषेखाली  असल्यास  क्रमांक व  गुणांसह दाखला, शासकीय  सेवेत  नसल्याबाबतचा तसेच  १ मे २००१ पुर्वी  ३ रे अपत्ये  नसलेबाबतचा   ग्रामसेवकाचा  दाखला, जमिनीचा  खाते उतारा, शेतमजूर  असल्यास  दाखला , लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी  बॅकेचे  प्रमाणपत्र  अथवा  स्वत:चे  हमीपत्र खाघ वाटप व प्रशिक्षण योजनेसाठी ग्रामपंचायतीचा  ठराव प्रत, पशुधन अधिकारी  विस्तार, पंचायत समिती यांची शिफारस इत्यादी  कागदपत्रे सादर  करणे आवश्यक आहे.      
            विशेष  घटक  योजने अंतर्गत दुधाळ  जनावरांचे  गट  वाटप  योजना  (२ गाई किंवा २ म्हशी ) व शेळी गट  वाटप  योजना  (१० शेळ्या + १ बोकड ) या योजनांसाठी  पात्र   लाभार्थीनी   दि . २० ऑगस्ट २०१६   पर्यत नजिकच्या  पशुवैघकीय  दवाखान्यांमार्फत   पंचायत  समितीकडील  पशुसंवर्धन  विभागाकडे  अर्ज सादर  करावेत, असेही डॉ.पवार यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment