Wednesday, July 20, 2016

नाशिक येथे कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

सातारा, दि. 20 (जि.मा.का): संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील परीक्षेकरिता पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
                सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीच्या पूर्वतयारी साठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे दिनांक 2 ऑगस्ट ते 15 ऑक्टोब, 2016 या कालावधीसाठी प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरुन दि. 12 ऑगस्ट 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.
                आय.एम.ए. विभाग, नेव्हल ॲकेडमी, एअरफोर्स ॲकेडमी आणि ऑफीसर्स ट्रेनिंग ॲकेडमी उमेदवार हा  2 जानेवारी 1994 ते 1 जानेवारी 1999  च्या दरम्यान जन्मलेला अविवाहित भारतीय युवक असावा व ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी  अविवाहीत महिला   उमेदवार 2 जानेवारी 1994 ते 1 जानेवारी 1999 च्या दरम्यान असावे.
                शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे: आयएमए व ओटीए साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर, समकक्ष, नेव्हल ॲकेडमीसाठी भौतिकशास्त्र व गणित विषयासह पदवीप्राप्त पदवीधर किंवा बी.ई., एअर फोर्स ॲकेडमीसाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाचा (भौतिकशास्त्र व गणित 10 +2 स्त्र विषयासह) पदवीधर किंवा बी.ई. अशी आहे.
                या प्रशिक्षण कालावधीत महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्रातील युवकांसाठी निवासाची, भोजनाची आणि प्रशिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणात प्रवेशासाठी दिनांक 27 जुलै 2016  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे हजर रहावे.  यावेळी पदवीपर्यंतच्या सर्व मुळ प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरची प्रिंट सोबत आणावी. सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्र. 0253-2451031 व  2451032 येथे संपर्क साधावा, असेही कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment