Friday, July 22, 2016

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर



पुणे 22, - राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातीलग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहेया कार्यक्रमानुसार  25 जुलै, 2016 रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्यात येणार असून 3 ऑेगस्ट,2016 ते 09 ऑगस्ट,2016 दरम्यान नामनिर्देशनपत्रे मागविणे सादर करणे, 10 ऑगस्ट, 2016 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे.
नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी 12 ऑगस्ट,2016  तारिख निश्चित करण्यात आली आहेयाच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात येवून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहेआवश्यक असल्यास 24 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 7-30 वा.पासून सायं.5-30 वाजेपर्यत मतदान घेण्यात येणार आहे. 26 ऑगस्ट,2016  रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार मतमोजणीचा दिनांक निश्चित करतील. 29 ऑगस्ट, 2016 रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा निकाल प्रसिध्द करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
0000



No comments:

Post a Comment