Thursday, July 28, 2016

पुणे शहरामधील वाहतूक मार्गात बदल


पुणे,दि.28: पुणे शहरातील वाहतूक सुरळीत  सुरक्षितपणे चालण्यासाठी वाहतूकव्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहेतअसे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलिसउपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ससाणेनगरकडून हांडेवाडी व महम्मदवाडीकडे जाताना व येताना ससाणेनगर रेल्वे गेट क्र. – 7 या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असते व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो यावर उपाय योजना म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत
हडपसर/ वानवडी वाहतुक विभाग पुणे अंतर्गत  ससाणेनगरकडून हांडेवाडीकडे जाणारी वाहतुक रेल्वेगेट क्रॉस केल्यानंतर एकेरी राहिल. (हांडेवाडी रोडने ससाणेनगरकडे येता येणार नाही.) हांडेवाडीहुन ससाणेनगर रेल्वेगेटकडे येण्यासाठी श्रीराम चौकातुन डावीकडे वळुन डी.पी. रोडने सुवर्णमंगल कार्यालय चौक येथून उजवीकडे वळून महम्मदवाडी रस्त्याने क्र.7 कडे येता येईल.
   रेल्वेगेट लगत इंडस्ट्रियल एरियावरील नवीन रस्त्याने  व येणारी वाहतुक ही सय्यदनगर  महम्मंदवाडी किंवा हांडेवाडी  रोडवर उजवीकडे वळून जाता येणार नाही . (ह्या वाहतुकीस फक्त डावीकडे वळुन ससाणेनगरकडेच जावे लागेल.) महम्मदवाडी / सय्यदनगर हा रस्ता रेल्वेगेट  क्र. 7 कडे जताना सुवर्णमंगल कार्यालयापासून पुढे रेल्वे गेट क्र. ७ पर्यंत ऐकेरी वाहतुकीचा राहील.  रेल्वे गेट क्र. ७ पासून महम्मदवाडी सय्यदनगरकडे महम्मदवाडी रोडने जाता येणार नाही.  सय्यदनगरहून येणाऱ्या वाहतूकीस रेल्वेगेट पार केल्यानंतर उजवीकडे वळून काळपडळ बायपास रोड व रेल्वे गेट नं. ८ कडे जाता येणार नाही.  सदर वाहतुक ससाणेनगर रोडने गणेश मंदिर चौकातून युटर्न घेवून ससाणेनगर येथून डावीकडे वळून काळेपडळ कडे जाता येईल. काळेपडळ बायपास रोडने रेल्वे गेट क्र. 7 कडे जाणाऱ्या वाहतुकीस रेल्वे गेट नं. 8 येथून उजवीकडे वळून ससाणेनगर रोडवर जाण्यास मनाई राहील.   नागरिकांच्या  काही सूचना असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, साधु वासवानी रोड, पुणे 1 यांच्या कार्यालयात गुरुवार  दि. 4 ऑगस्ट, 2016 पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात.  नागरिकांच्या सूचना व हरकती यांचा विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येतील.
              समर्थ वाहतुक विभाग पुणे अंतर्गत नाना पेठ पोलीस चौकी ते घर क्र. 603 नाना पेठ मारुती मंदिर व धुंद दुकानापर्यंतचे सार्वजनिक बोळात नो-पार्किंग करण्यात येत आहे.  नाना पेठ पोलीस चौकी डी. पी. ते चांद तारा मसजीद पर्यंत पी 1 पी 2 करण्यात येत आहे.    विनय हायस्कुल कंपाऊंडला लागून 25 मी. नो पार्किंग व विनय हायस्कुलच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूस (कासेवाडीकडे जाणाऱ्या लेनवर) रस्त्याच्या दोन्ही बाजूस 25 मी. नो पार्कींग करण्यात येत आहे.  नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, साधु वासवानी रोड, पुणे 1 याच्या कार्यालयात दि. मंगळवार 2 ऑगस्ट, 2016 पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात.  नागरिकांच्या सूचना व हरकती यांचा विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येतील,  असेही डॉ. प्रविण मुंढे यांनी कळविले आहे.
*****
 

No comments:

Post a Comment