Thursday, July 14, 2016

शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कारासाठी अर्ज करावे


            पुणे दि. 14 : पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती भ्ंटक्या व विमुक्त जातीचे कल्याण कार्य करणाऱ्या समाजसेवक व सामाजिक संस्थांना त्यांनी विहित अटी पुर्ण केल्यास शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, पद्मश्री  कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व संत रविदास पुरस्कार देण्यात येतात.  सन 2016-17 साठीच्या पुरस्कारांसाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींचे व संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
            शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिकासाठी महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामुळे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्टीय  पातळीवर एक समाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये काम करणऱ्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.
            महाराष्ट्र राज्यातील 8 महसुल विभागासाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 6 संस्था, प्रती संस्थेस रुपये पंधरा लक्ष, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ स्वरुपात पारितोषिक देण्यात येते. पोलीस अधिक्षक/आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल तसेच संबधित संस्था ही सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणारी असावी. सामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे आवश्यक आहे.
पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी  रुढी पंरपरेविरुध्द व अस्पृश्यतेविरुध्द सामाजिक चळवळ उभारलेल्या भूमीहीन  शेतमजूर कामगांरासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना प्रदान करणात येतो. यासाठी प्रती व्यक्ती रक्कम रुपये एकावन्न हजार, शाल व श्रीफळ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र पुरस्काराचे स्वरुप आहे.  व्यक्‍तीचे वय किमान 50 वर्षै, स्त्रीचे वय किमान 40 वर्षै, व्यक्ती व संस्था  सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणारी असावी. सामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे आवश्यक. पोलीस आयुक्त अथवा पोलीस अधीक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवालासह अर्ज करावा.
            संत रविदास पुरस्कारासाठी चर्मकार समाजाच्या व दलित समाजाच्या  ऊध्दारासाठी  काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना प्रदान करणात येतो. प्रती व्यक्ती रक्कम रुपये एकवीस व संस्थेस रुपये तीस हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. व्यक्‍तीचे वय किमान 50 वर्षै  व स्त्रीचे वय किमान 40 वर्षै, पोलीस आयुक्त अथवा पोलीस अधीक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवालासह अर्ज करावा. व्यक्ती व संस्था  सामाजिक न्याय क्षेत्रात चर्मकार व दलित समाजासाठी  काम करणारी असावी .
पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करताना तीन प्रती मध्ये दाखल करणे आवश्यक आहे.  प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2016 असून विहीत नमून्यातील अर्ज समाज कल्याण विभागात उपलब्ध आहेत. पात्र समाज सेवकांनी व संस्थांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, पी.एम.टी.इमारत, कामगार न्यायालयाच्यावर, दुसरा मजला, स्वारगेट, पुणे-400 042 येथे कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन कामकाजादिवशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक समाज कल्याण आयुक्त एस.आर.दाणे यांनी केले आहे.  
000
https://www.facebook.com/ddipune/posts/1038156909605161

No comments:

Post a Comment