Sunday, July 10, 2016

दर्शन मंडपात अतिदक्षता कक्ष कार्यान्वित : वारक-यांच्या सेवेसाठी मंदीर प्रशासन सज्ज

दर्शन मंडपात अतिदक्षता कक्ष कार्यान्वित
 अतिदक्षता कक्ष 24 तास सुरु
                                         ......डॉ.चव्हाण



पंढरपूर दि. 10 :- आषाढी वारीसाठी येणा-या वारकरी भाविकांना  आरोग्य विषयक सोयी-सुविधा मिळण्यासाठी आरोग्य विभागा सज्ज असून दर्शन मंडपात उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने अतिदक्षता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
या अतिदक्षता कक्षाचे उदघाटन पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.हनुमंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.प्रशांत शिंदे यांच्यासह आरोग्य विभाचे व मंदीर यमितीचे कर्मचारी उपस्थित होते.
दर्शन मंडप येथील अतिदक्षता कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून, कक्षामध्ये  तज्ज्ञ डॉक्टर व मदतनिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कक्षामध्ये आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपसंचालक डॉ.चव्हाण यांनी सांगितले.
                                              वारक-यांच्या सेवेसाठी
मंदीर प्रशासन सज्ज


आषाढी वारीसाठी पंढरपूरात श्री. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविक येत असतात. येण्या-या वारकरी भविकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाबरोबरच मंदीर प्रशासनही सज्ज झाले असल्याची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी रविंद्र कुलकर्णी यांनी दिली.
 वारीसाठी येणा-या वारकरी भाविकांना  दर्शना मंडपात शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येते आहे. भाविकांच्या  सुरक्षतेसाठी मंदीरात व परिसरात एकूण 82 सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सी.सी.टी.व्ही कॅमे-याचे कंट्रोल रुम तुकाराम भवन व मंदीरात कार्यान्वित आहेत. तसेच भाविकांना लाईव्ह दर्शनचा लाभ घेता यासाठी दर्शन मंडप, पत्रशेड, नामदेव पायरी, महाव्दार घाट व सारडा भवन येथे एल.ई.डी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. भाविकांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी लाऊड स्पिकरही लावण्यात आले आहेत.
वारक-यांच्या सेवेसाठी दर्शन मंडपात भारत सेवा संघ कोलकत्ता यांचे स्वयंसेवक दाखल झाले असून या स्वयंसेवकांमार्फत वारक-यांना आरोग्य विषयक आवश्यक सेवा  पुरविण्यात येणार आहे.  मंदीर, दर्शनमंडप व मंदीर परिसर स्वच्छतेसाठी  मंदीर प्रशासनामार्फत मंदीर समितीतील कर्मचा-याबरोबरच रोजंदारीवरील कर्मचारी नियुक्ती करण्यात आले असून, यासाठी स्वकाम स्वयंसेवकांचीही मदत घेण्यात  आली असल्याची माहितीही मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री कुलकर्णी यांनी दिली.

                                                          00000

No comments:

Post a Comment