Thursday, July 21, 2016

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करावे



          पुणे, दि.21 : दरवर्षी 8 मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिवस' म्हणून साजरा करण्यात येतोया दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाने सन 2015 पासून ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे अशा महिला व संस्थांच्या सन्मानार्थ 'नारी शक्ती पुरस्कार'  देण्यात येतोसंस्थेसाठी 2 लाख रुपये व वैयक्तिक पुरस्कारासाठी एक लाख रुपये व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरुप आहेया क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व महिलांना सदर पुरस्कार 8 मार्च, 2017 या जागतिक महिला दिनी प्रदान करण्यात येणार आहे
     स्त्रीयांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना 'राणी गायडींनलियु झेलिंअंग पुरस्कार' देण्यात येतोया पुरस्कारासाठी ग्रामीण किंवा डोंगराळ भागातील आपत्तीग्रस्त महिलांना सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. संस्था नोंदणीकृत असावी तसेच महिलांसाठी कामकाजाचा किमान 5 वर्षे अनुभव असावासंस्थेचे महिलांच्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असावे आणि राज्याने त्यांच्या कार्याची दखल घेतलेली असावी किंवा परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळा किंवा इतर माध्यमांतून शिक्षण व जाणीव जागृती केलेली असावी.
  महिलांवर होणारे अत्याचार, हिंसाचार व शोषण या विरोधात धाडस व शौर्य दाखविले आहे अशा महिलांना 'साहस व शौर्य पुरस्कार' देण्यात येणार आहे.
महिला सबलीकरणाकरीता कार्य करणाऱ्या महिलांसाठी पुरस्कार
     हा पुरस्कार महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे. पात्र इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासह त्यांचे प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांच्या कार्यालयाकडे 30 ऑगस्ट, 2016 पर्यंत सादर करावेत. यानंतर येणाऱ्या अर्जांचा या पुरस्कारांकरीता विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, 103 जुना तोफखाना, चुनावाला चेंबर्स, शिवाजीनगर, पुणे-5 (दूरध्वनी क्र. 020-25536871) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
*******



No comments:

Post a Comment