Saturday, July 30, 2016

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याहस्ते शासकीय वसतिगृह इमारतीचे आज उदघाटन


पुणे, दि. 30–सामाजिक न्याय विशेष सहाय विभागार्फत शिरुर, जि. पुणे येथे 100 विद्यार्थिनी क्षमतेचे मुलींचे शासकिय वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या  इमारतीचा पायाभरणी  समारंभ सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग मंत्री श्री.राजकुमार बडोले यांच्याहस्ते पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट यांचे अध्यक्षतेखाली 31 जुलै 2016 रोजी दुपारी 1-30 वाजता  होणार आहे. हा कार्यक्रम शिरुर-पुणे-अहमदनगर महामार्गालगत गोलेगाव रोड, शिरुर या ठिकाणी  आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग राज्यमंत्री दिलीप कांबळे राज्यमंत्री, खा.शिवाजीराव आढळराव पाटील मा..बाबुराव पाचर्णे, नगराध्यक्षा सौ.सुवर्णाताई लोळगे उपनगराध्यक्ष प्रकाशशेठ धारिवाल हे उपस्थित राहणार आहेत.
31 जुलैरोजी दुपारी 4-30 वा मोशी (पिंपरी चिंचवड),पुणे  येथे 250 विध्यार्थिनी क्षमतेचे मुलींच्या शासकिय वसतिगृह इमारतीचे उदघाटन सामाजीक न्याय विशेष सहाय विभाग मंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट यांचे अध्यक्षतेखाली तसेच सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर शकुंतला धराडे, खा.अमर साबळे, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, . महेशदादा लांडगे, .लक्ष्मण जगताप, .गौतम चाबुकस्वार, उप महापौर प्रभाकर वाघेरे यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेला आहे. दोन्ही कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे अवाहन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment