Tuesday, July 12, 2016

उघडेवाडी येथे वैष्णवांचा मेळा- भक्तिमय वातावरणात संपन्न




पंढरपूर दि. 12 –  वेळापुर येथील रात्रीचा मुक्काम आटोपुन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी उघडेवाडी ठाकुरबुवाच्या दिशने आज सकाळी  लवकर निघाली.  साधारणत: 8.40 वाजता पालखी ठाकुरबुवा  येथे दाखल झाली.
ठाकुरबुवा  येथे माऊलींचे जिल्ह्यातील तीसरे गोल रिंगण सकाळी 9.05 च्या सुमारास मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. या प्रसंगी अश्वांनी गोल रिंगण फेरी पुर्ण करताच उपस्थित वारक-यांच्या मुखाव्दारे माऊली-माऊली चा जयघोष मोठ्या प्रमाणावर निघाला. हा सोहळा यशस्वी रित्या संपन्न होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोतोपरी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
यावेळी प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार वर्षाराणी भोसले, माढ्याचे गटविकास अधिकारी मनोज जाधव, यांच्यासह सबंधीत अधिकारी-कर्मचारी, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
                                 0000

No comments:

Post a Comment