Tuesday, July 5, 2016


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे
बारामती शहरात उत्स्फुर्त स्वागत



बारामतीदि. 05 : तालुक्यातील उंडवडी मुक्कामी विश्रांती घेतल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवार दि. 05जुलै 2016 रोजी सायंकाळी बारामती शहरात आगमन झालेपालखीचे नगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले.यावेळी बारामती शहर  तालुक्यातील हजारो भाविकांनीही पालखी सोहळ्याचे उत्स्फुर्त स्वागत केले
            यावेळी नगराध्यक्ष योगेश जगतापउपनगराध्यक्षा ज्योती बल्लाळ,‍ उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश देशमुखशहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधवतालुका वैद्यकीय अधिकारीडॉमहेश जगतापबारामती नगरपालिकेचे पदाधिकारीनगरसेवकविविध विभागांचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते

स्वागत कमानी  कक्ष
            बारामती नगरपालिकेच्यावतीने पाटस रोडदेशमुख चौक येथे उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात पालखीचे स्वागतकरण्यात आलेपालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्यात्यानंतर पालखीशहरातून मुक्कामासाठी शारदा प्रांगणातील मंडपात आणण्यात आलीपालखीच्या मुक्कामासाठी शारदा प्रांगणात मोठा मंडपउभारण्यात आला होतामंडपात पुरुष  स्त्रियांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांना पालखीचे दर्शन सुकरझाले.
शारदा प्रांगणात भव्य मंडपासह आकर्षक सजावट
            पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी नगरपालिकेच्या शाळांमध्ये मुक्कामाची व्यवस्था नगरपालिकेच्यावतीने करण्यातआली होतीशारदा प्रांगणाच्या प्रवेशव्दारावर स्वागत कमान उभारण्यात आली होतीतसेच परिसराला विद्युत रोषणाईहीकरण्यात आली होतीत्याच बरोबर सभामंडपात अभंग  भक्तीगीतांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
स्वच्छतेची विशेष व्यवस्था
शहर  परिसरात विविध ठिकाणी स्वयंसेवी संस्थागणेश मंडळे सेवाभावी संस्थांच्याकडून वारकऱ्यांना मोफतभोजनचहा  नाष्ट्याची सोय करण्यात आली होतीअशा ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी पालिकेकडून विशेष व्यवस्थाकरण्यात आली होतीत्यासाठी पालिकेने  कोरोगेटेड कचराकुंड्यांची व्यवस्था केली होती.  
मुबलक  शुध्द पाणी
            वारकऱ्यांना मुबलकशुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून प्रशसनाच्यावतीने विशेष पाण्याच्या टँकरची व्यवस्थाकरण्यात आली होतीत्याच प्रमाणे नगरपरिषदेची समाजमंदिरेशाळा या ठिकाणी वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यातआली होतीया ठिकाणीही स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विशेष स्वच्छता पथके तैनात करण्यात आली होती.पालखी सोहळ्या दरम्यान पालिकेच्यावतीने फिरती स्वच्छतागृहेही ठेवण्यात आली होती.

परिणामकारक आरोग्य सेवा
            पालखी मार्गावर आरोग्य विभागाच्या पाच फिरत्या आरोग्य पथकांव्दारे तसेच औषधोपचार केंद्रांच्या माध्यमातूनवारकऱ्यांना आरोग्य सेवा प्रशासनाच्यावतीने पुरवविण्यात आलीबारामती नगरपालिकेनेही शहरात वारकऱ्यांना आरोग्य सेवापुरविण्यासाठी स्वतंत्र आरोग्य पथके तैनात केली होतीखबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या.त्यामुळे आरोग्य सेवाही परिणामकारक होती.
कडक पोलीस बंदोबस्त
            पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस विभागानेही कडक बंदोबस्त ठेवला होतात्यामुळेवारकऱ्यांची  भाविकांच्या सुरक्षिततेची योग्य प्रकारे खबरदारी घेण्यात आलीपालखी सोहळ्यासोबत आलेल्या इतर दिंडीच्यावाहनांची वाहतुक रिंग रोड वरुन वळविण्यात आल्याने शहरातील वाहतुकीचा ताण कमी झाला होतावाहतुकीची कोंडी होवू नयेम्हणून ठिकठिकाणी वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले होतेसोहळ्यातील वारकऱ्यांची  भाविकांची गैरसोय होवू नयेयासाठी प्रशासनाच्यावतीने काटेकोर काळजी घेण्यात आली
स्वच्छतेचा संदेश
राज्य शासनाच्या पाणी पुरवठास्वच्छता विभाग  ग्रामविकास विभागाच्यावतीने वारीदरम्यान स्चछतेचा संदेशदेण्यासाठी स्वच्छता दिंडी  ग्रामसभा दिंडीसह प्रबोधनाचे विविध चित्ररथ ठेवण्यात आले आहेतत्यामुळे वारकऱ्यांना नागरीकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहेया स्वच्छता दिंडीचे हे अकरावे वर्ष असून या चित्ररथावर ग्रामीणविकासाच्या विविध योजनास्वच्छताग्रामसभांचे आदींचे बॅनर लावण्यात आले आहेततसेच शहरातील विविध शाळांतीलविद्यार्थी स्वच्छतेचा संदेश देणारे फलक  खराटे हातात घेवून स्वच्छतेचा संदेश देत होतेयावेळी स्वच्छतेच्या विविध घोषणाहीदेण्यात येत होत्या.

*********

No comments:

Post a Comment