Thursday, July 21, 2016

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी


पुणे, दि.21 : संघ लोकसेवा आयोग (UPSC), नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा 23 ऑक्टोबर, 2016 रोजी घेण्यात येणार असून सदर परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट, 2016 अशी आहेसदर परीक्षेची जाहिरात 16 ते 22 जुलै, 2016 या कालावधीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर (रोजगार समाचारपत्रमध्ये आणि संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांची वेब साईट http://www.upsconline.nic.in  वरही प्रसिध्द होणार आहे.
   कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील स्थायी नवयुवक व नवयुवतींसाठी 2 ऑगस्ट, 2016 ते 15 ऑक्टोबर, 2016 या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 52 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहेसदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
तरी पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे शुक्रवार 29 जुलै, 2016 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावेमुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google plus पेज वरील दिलेल्या Check List सोबत असणारी सर्व कागदपत्रे व महत्वाच्या तारखाचे (Important Dates') अवलोकन करुन, त्यांना डाऊन लोड करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन घ्यावे.
     अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

**** 

No comments:

Post a Comment