Wednesday, July 27, 2016

ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक व पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर


सातारा, दि. 27 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर ते डिसेंबर, 2016 या महिन्यात मुदती संपणाऱ्या जिल्ह्यातील 1 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक 27 ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.  निवडणूक कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींसाठी 24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी  सांगितले.
जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मार्ली या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रत तर सातारा तालुक्यातील लिंब, शहापूर, सोनापूर, कोरेगाव तालुक्यातील पाडळी स्टेशन, भाडळे, वेलंग (कण्हेरखेड), तडवळे सं. वाघोली, जांब खुर्द, पवारवाडी, मुगाव, कराड तालुक्यातील गोवारे, कळंत्रेवाडी, कुसुर, वाई तालुक्यातील वहागाव, सटालेवाडी, दरेवाडी, धावडी, महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड,फलटण तालुक्यातील ढवळ, निरगुडी, डोंबाळवाडी, परहर बु., गोळेवाडी, ताथवडा, उपळवे, माण तालुक्यातील श्रीपालवन व दिडवाघवाडी या ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रमही आयोगाने एकाच आदेशाने जाहीर केला आहे.
निवडणूकीचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे.  ुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील 7 मधील पोट नियम (1) अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत पोट नियम (2) नुसार नमुना मधील निवडणूकीची नोटीस प्रसिद्धीचा दिनांक 25 जुलै 2016,  नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा सादर करण्याचा (नमुना-अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) दिनांक वेळ दिनांक 3 ते 9 ऑगस्ट 2016 पर्यंत सकाळी 11 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत.  नामनिर्देशन पत्रे छाननी करण्याचा दिनांक वेळ दि. 10 ऑगस्ट  रोजी सकाळी 11 वाजल्यापासून.  नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक वेळ दिनांक 12  ऑगस्ट रोजी   दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक वेळ 12 ऑगस्ट  रोजी दुपारी 3 वाजेनंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत.  मतमोजणीचा दिनांक 26 ऑगस्ट असा राहील.  मतमोजणीचे ठिकाण वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.  मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम, 1959 मधील 37 नुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2016 असा राहील.

0000
ग्रामपंचयात निवडणूक लढविणाऱ्यांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र जोडवे
सातारा, दि. 27 (जिमाका) : ग्रामपंचायत राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र किंवा जातप्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्याची पोच व विहित नमुन्यातील हमीपत्र नामनिर्देशनपत्रासोबत जोडवे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी केले आहे.
सार्वत्रिक व पोट निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रात दि.21 जुलै पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. नामनिर्देशनपत्रासह निवडणूक प्रक्रीया ही पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने शौचालय वापराबाबत ग्रामसभेच्या ठरावासह प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. (केवळ ग्रामसेवक यांनी शौचालय वापराबाबचा दिलेला दाखला लागू होणार नाही). ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने (बिनविरोधसह)  निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत एकत्रित खर्चाचा तपशील विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्रासह सादर करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब विहित कालावधीत सादर न करणाऱ्या उमेदवारास जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पुढील 5 वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात येईल, असेही अपर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment