Thursday, July 21, 2016

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना संगणक व इतर ई-लर्निंग साहित्य वाटपाचा कार्यक्रम


                सातारा, दि.21 (जिमाका) :  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत 22 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना डिजीटल क्लासरुमसाठी संगणक व इतर ई-लर्निंग साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीचे सभापती सतीश चव्हाण यांनी दिली.
                हा कार्यक्रम माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे,आमदार शशिकांत शिंदे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष रवी साळुंखे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली फडतरे, समाज कल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
                या कार्यक्रमात देशासाठी बलीदान दिलेल्या शहीद वीर जवानांच्या वारसांना प्रत्येकी 1 लक्ष रुपये धनादेशाचे वाटप केले जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांची रिओ येथे होणाऱ्या ऑलपिक स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्यांना मदत म्हणून 1 लक्ष रुपयांचा धनादेशही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment