Friday, July 22, 2016

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळा व्यवस्थापनाने सामंजस्य करार करण्यासाठी पुढाकार घ्यावा; पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे यांचे आवाहन



            पुणे, दि. 22शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित झाली पाहिजे यासाठी शाळा व्यवस्थापन आणि शालेय बस वाहतूक सेवा कंत्राटदारांमध्ये आवश्यक सामंजस्य करार करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे यांनी आज येथे केले. पोलीस आयुक्तालयात झालेल्या जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
            शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक आज येथे पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस सेवेबद्दल शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन होते किंवा कसे, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुक, पार्कींगची समस्या, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
            सुरक्षित वाहतुकीसंदर्भात शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन शालेय बस वाहतूकदारांकडून काटेकोरपणे होईल याची दक्षता सर्व संबधित अधिकारी विभागांनी घ्यावी असे निर्देशही पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे यांनी दिले. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये कार्यरत असणाऱ्या स्त्री कर्मचाऱ्यास शाळा व्यवस्थापनाने शाळेतील प्रसाधन गृहाची सेवा उपलब्ध करुन द्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली. बैठकीत जून, 2016 पासून सुरु झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शहरातील जिल्हयातील शाळा प्रशासन शालेय बस वाहतूकदार यांनी शालेय विद्यार्थी वाहतूक जास्तीत जास्त सुरक्षित करण्याबाबत चर्चा होऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या.
            बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, जिल्हा स्कूल बस सुरक्षित वाहतूक समितीचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, उप प्रादेशिक परिवन अधिकारी विनोद चव्हाण, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंद, समितीचे सदस्य शाम जांभूळकर स्कुल बस सुरक्षित वाहतूक समितीशी संबधित अधिकारी उपस्थित होते.


000

No comments:

Post a Comment