Thursday, July 28, 2016

गॅस सिलिंडरच्या वजनात फसवणूक करणाऱ्या राज्यातील 137 वितरकांवर खटले दाखल


 
ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्या निर्देशानुसार वैध मापन शास्त्र यंत्रणेची राज्यभर कारवाई
- निर्धारित वजनापेक्षा कमी वजनाच्या गॅस सिलिंडरचे वितरण करणाऱ्यांवर कारवाई
- गॅस सिलिंडरचे वजन न करता वितरीत करणाऱ्यांवरही खटले
मुंबई, दि. 28 : घरगुती गॅस सिलिंडरच्या वजनातील ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैधमापन शास्त्र यंत्रणेने राज्यातील 325 गॅस वितरक कंपन्यांची तपासणी केलीयावेळी सिलिंडरमध्ये कमी गॅस भरल्याप्रकरणी तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 137 वितरकांवर यंत्रणेने खटले दाखल केले आहेत.
घरगुती गॅस सिलिंडर विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्याकडे आल्या होत्याया तक्रारींची दखल घेत राज्यातील गॅस वितरकांची तपासणी करण्याचे आदेश वैधमापन शास्त्र यंत्रणेला दिले होतेया निर्देशानुसार यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी विशेष तपासणी मोहीम राबविलीयामध्ये राज्यातील 325 गॅस वितरकांची तपासणी करण्यात आली.वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याअंतर्गत नियमातील तरतुदीनुसार एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना देताना वजन करून देण्यासाठी व ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक वजनाचा गॅस मिळण्यासाठी अचूकता वर्ग 3, अधिकतम क्षमता किलो व ई 10 ग्रॅअसलेले तोलन उपकरण वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे वितरकाने उपलब्ध करून देणे बंधनकारक आहेया सर्व नियमांची तपासणी यावेळी करण्यात आली.
तपासणी दरम्यान सिलिंडरमध्ये गॅसचे वजन कमी भरल्याप्रकरणी 3वितरकांवरवितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे वजन काटा उपलब्ध न केल्याप्रकरणी 61, वजनमापन उपकरणांची नियतकालिक पडताळणी व मुद्रांकन न केल्याबद्दल 30 जणांवर आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 43 अशा एकूण 137 वितरकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.
ग्राहकांनी त्यांना एलपीजी सिलिंडरमधून मिळणारा गॅस हा 14.2 किलो आहे, याची खात्री करून घ्यावी. यासाठी सिलिंडर खरेदी करताना त्याचे वजन करून घ्यावे. यासंदर्भात गैरप्रकार आढळल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेस कळवावे, असे आवाहन ग्राहक संरक्षण मंत्री श्री. बापट यांनी केले आहे.
ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी मुख्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. 022-22886666 अथवा  ई-मेल पत्ता-dclmms_complaints@yahoo.com किंवा व्हाटस् अप क्रमांक9869691666  अथवा Facebook वर Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या ठिकाणी संपर्क साधावातसेच यासंबंधी विभागीय स्तरावर खालील ठिकाणी संपर्क साधावा.
मुंबई महानगर विभाग-  दुरध्वनी क्र. 022-24148494, -मेल-dyclmmumbai@yahoo.in व्हाटस् अप क्रमांक 9004435101.
कोकण विभाग (ठाणेरायगडरत्नागिरी व सिंधुदुर्ग) - दुरध्वनी क्र. 022-27574074, -मेल- -dyclmkokan@yahoo.inव्हाटस् अप क्रमांक - 9004435101
पुणे विभाग  (पुणे , सातारासांगलीकोल्हापूर व सोलापूर) - दुरध्वनी क्र. 020-26697232, -मेल - dyclmpune@yahoo.inव्हाटस् अप क्रमांक - 7588132176
नाशिक विभाग  (नाशिकअहमदनगरधुळेजळगांव व नंदुरबार.) -दुरध्वनी क्र.   0253-2455696; -मेल - dyclmnashik@yahoo.in,व्हाटस् अप क्रमांक9422252400
औरंगाबाद विभाग (औरंगाबादपरभणीनांदेडजालनाबीडलातूर व उस्मानाबाद.) - दुरध्वनी क्र.0240-2339656; -मेल -dyclmaurangabad@yahoo.inव्हाटस् अप क्रमांक– 7588554400
अमरावती विभाग (अमरावतीयवतमाळअकोला वाशिम व बुलढाणा.) -दुरध्वनी क्र.0721-2663291; -मेल - dyclmamravati@yahoo.in,व्हाटस् अप क्रमांक- 9422258800
नागपूर विभाग (नागपूरवर्धाचंद्रपूरगडचिरोलीभंडारा व गोंदिया) -दुरध्वनी क्र. 0712-2540292; -मेल - dyclmnagpur@yahoo.inव्हाटस् अप क्रमांक - 9404951828.
वरील ठिकाणी यासंबंधी तक्रारी नोंदवाव्यातअसे आवाहन वैधमापन शास्त्रयंत्रणेचे नियंत्रक श्री. गुप्ता यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment