Saturday, July 30, 2016

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 2 ऑगस्ट पर्यत मुदतवाढ



पुणे,30 :- शासनाने खरीप हंगाम 2016 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी  सहभाग घेण्याची  अंतिम मुदत 31 जुलै, 2016 अशी होती. तथापि, 29 जुलै 2016 रोजी असलेला बँकांचा संप   31 जुलै 2016 रोजीची साप्ताहिक सुट्टी विचारात घेऊन केंद्रशासनाने 29 जुलै, 2016 चे पत्रान्वये योजनेत   शेतकऱ्यांचा सहभाग होण्याची मुदत वाढवून ती  2 ऑगस्ट, 2016 अशी केली आहे.
 तरी शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरिता तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन  मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय,पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
0000



No comments:

Post a Comment