Monday, July 25, 2016

ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी जिल्हयात पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती



 पुणे, 25 :- ध्वनी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी प्रदूषण (नियमन नियंत्रण) नियम-2000 प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने प्राधिकरणे निश्चित केलेली आहेत. त्याचप्रमाणे गृह विभागाच्या डीआयएस 0910/प्र.क्र.434/विशा-1,, दिनांक 14 जुलै, 2015 अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना ध्वनी प्रदूषण नियंत्रणाकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.
            जनतेच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या तक्रारी प्राप्त करुन घेण्यासाठी तसेच उत्सवाच्या वेळी आणि  पूर्वपरवानगीने आयोजित केलेल्या करमणूक कार्यक्रमाच्यावेळी अचानक भेटी देवुन ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांतर्फे जिल्हयातील 36 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.  जिल्हयातील नागरिकांना ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार देणे सुलभ व्हावे यासाठी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस्थळावर (www.puneruralpolice.gov.in) प्रदर्शित करण्यात आली आहे. पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 100 वर देखील तक्रारी देता येतील. नागरिकांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत काही तक्रारी असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक एम.बी.पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment