Wednesday, July 13, 2016

श्री विठ्ठल-रूक्मिणी महापूजा थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीवर


            पंढरपूर, दि. 13 : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर आषाढी एकादशीच्या पहाटे शुक्रवार, दि. 15 जुलै 2016 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या श्री विठ्ठल-रूक्मिणी महापूजेचे थेट प्रसारण पहाटे 2 वाजून 10 मिनीटांपासून सकाळी 6.00 वाजेपर्यंत होणार आहे.
प्रथम विठ्ठल महापूजेनंतर रूक्मिणी महापूजामंदिर समिती आयोजित सत्कार समारंभ तसेच समितीच्या वतीने यंदा होत असलेल्या अभंगवाणी कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. या थेट प्रसारणात समालोचन तज्ज्ञ म्हणून ह.भ.प. वा. ना. उत्पातडॉ. रामचंद्र देखणेतसेच निवेदक म्हणून नरेंद्र बेडेकर आणि मयूर आडकर यांचा सहभाग आहे. अभंगवाणी कार्यक्रमाचे सहभागी कलावंत सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आहेत. या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण शुक्रवार
दि. 15 जुलै 2016 रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून होईल.
            आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला गुरूवार दि. 14 जुलै 2016 रोजी आषाढी एकादशी 2016 पूर्व तयारी या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण संध्याकाळी 7.30 वाजता सह्याद्री वाहिनीवर करण्यात येईल.
            गेली 16 वर्षे मंदिर समिती फक्त महापूजेच्या प्रसारणाची परवानगी सह्याद्री वाहिनीला देत असून यंदाही फक्त या महापूजेचे थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीवरच होत असल्याचे मुंबई दूरदर्शनचे सहाय्यक संचालक जयु भाटकर यांनी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment