Monday, July 18, 2016

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जाचे वितरण


पुणे दि. 18 :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे महामंडळातर्फे थेट राबविल्या जाणाऱ्या योजनेमधून सन 2012-13, 2013-14 व 2014-15 या कालावधीतील कर्ज वितरण झालेल्या लाभार्थींची यादी साहितयरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, 424, मंगळवार पेठ, पुणे-411 011 येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. यादीतील तपशीलात लाभार्थींच्या नावासमोर जी रक्कम दर्शविण्यात आली ती पूर्ण रक्कम संबधित लाभार्थीला मिळाली नसेल किंवा कर्ज वितरणाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी दूरध्वनी क्रमांक 022-22672585, 022-25751485 अथवाhccidcrikb@gmail.com ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment