Monday, July 25, 2016

दोन कोटी वृक्ष लागवड मोहीम वनमंत्र्यांकडून माहिती व जनसंपर्क विभागाचे अभिनंदन


            मुंबईदि. 25: राज्य शासनाच्या वन विभागाने दि. 1 जुलै 2016 रोजी राज्यभरातदोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करून उद्दिष्ट पूर्ण केले आहेया मोहिमेत माहिती जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्धी  जनजागृतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल वनमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
            या मोहिमेसाठी माहिती विभागाने वृत्तपत्रेआकाशवाणीविविध वृत्त वाहिन्या,महान्यूज वेबपोर्टलसोशल मीडियालोकराज्य  महाराष्ट्र अहेड मासिके अशा विविधप्रसार माध्यमातून प्रभावीपणे प्रसिद्धी मोहीम राबविली होती.
            यासंदर्भात वनमंत्री श्रीमुनगंटीवार यांनी माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह यांनाविशेष अभिनंदन पत्र पाठवले आहेअभिनंदन पत्रात वनमंत्री म्हणतातलोकराज्य,महाराष्ट्र अहेड जुलै 2016 च्या अंकात संकल्पाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीलेख,व्याघ्र संवर्धनासंबंधीची माहिती अभ्यासपूर्ण  महत्वपूर्ण आहेतसेच ‘शिवार भरू लागलेया लेखात जलयुक्त शिवार योजनेची माहिती शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारी आहेशिवायआधुनिक शेती आणि अधिक उन्नती’ या लेखातून 44 व्या संयुक्त कृषी संशोधनपरिषदेत झालेल्या चर्चेमधील महत्वाचे चिंतन देण्यात आले आहेअसेही वनमंत्र्यांनी नमूदकेले आहे.
            जगातील वाघ’ हा लेखही वाघाविषयी सर्वांगीण माहिती देणारा आहेएकूणचअंकातील वनसंवर्धनव्याघ्र संवर्धनजलजमीन यांच्या संवर्धनाची माहिती देणारे लेखअसल्यामुळे हा अंक माहितीपूर्णवाचनीय  आकर्षक झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
            महासंचालनालयाने वनमंत्र्यांच्या संकल्पाची व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीनेराज्यभरात प्रसिद्ध मोहीम राबविलीलोकराज्यमहाराष्ट्र अहेड या मासिकातून लेखाद्वारेतर महान्यूज या शासकीय वेबपोर्टलवरून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या सदरातूनराज्यभरातील विविध तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध करण्यात आलेशिवाय वृत्त विभागजाहिरात,सोशल मीडियाद्वारेही वनसंवर्धनाविषयी व्यापक प्रसिद्धी देण्यात आलीट्विटरफेसबुक,व्हाटसअॅप या सोशल मीडियाद्वारेही वृक्षांचे महत्व पटवून देण्यासह पत्रकारांना लेख,बातम्या आदी मजकूर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आला.
            वनमंत्री श्रीमुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत यशस्वी योगदानदिल्याबद्दल लोकराज्यचे अतिथी संपादक  मनीषा पाटणकर-म्हैसकरमुख्य संपादक ब्रिजेशसिंहप्रबंध संपादक देवेंद्र भुजबळसंपादक सुरेश वांदिले आणि संपूर्ण लोकराज्य टीमसहमहासंचालनालयाचे अभिनंदन केले आहे.
००००

No comments:

Post a Comment