Thursday, July 28, 2016

बीबीएफ द्वारे भुईमुग पेरणीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ


            सातारा, दि.28 (जिमाका) : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे कृषी सप्ताह निमित्त बीबीएफ द्वारे भुईमुग पेरणीचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या हस्ते करण्यात आला.
            यावेळी प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार जोगेंद्र कटयारे, पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी राजेश भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदेआदी उपस्थित होते.
              जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी रुंद सरी वरंभा पेरणी पध्दत, बिज प्रक्रियेचे महत्व सांगितले. यानंतर जलयुक्त शिवार अभियान अतंर्गत वेळु गावात केलेल्या बांध बंदिस्ती वर तुर लागवडीची प्रत्यक्ष पहाणी करुन   गावामध्ये 150 हेक्टर क्षेत्रावर तुर लागवड करण्याची तयारी गावक-यांनी केली आहे याबद्दल त्यांनी गावक-यांचे अभिनंदनही केले. आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष असल्यामुळे त्यांनी कडधान्य पिकांचे महत्व सांगून शेतक-यांनी कडधान्य पिकाची लागवड करुन डाळीचे दर कमी करण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
            अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भोसले यांनी शेतक-यांना रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणी केल्यामुळे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या कृषी जागृती सप्ताहाविषयी माहिती दिली व कृषी विभागाच्या पीक प्रात्यक्षिकांची माहिती दिली.
शेतकऱ्यांनी बांधावर तुर लागवड करुन त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करावी. कोरेगाव तालुक्यामध्ये नवीन बांध बंदिस्तीवर 590 हेक्टर क्षेत्रावर बांधावर तुर लागवडीसाठी बीडीएन-711 वाणाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. याची लागवड बांधावरती करण्यात येणार आहे अशी माहिती ही तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास  कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
00000

            

No comments:

Post a Comment