Wednesday, July 20, 2016

जवाहर नवोदय विद्यालयातील इ. 6 वी निवड परीक्षेसाठी 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत


                सातारा, दि. 20 (जि.मा.का): जवाहर नवोदय विद्यालय, सातारा येथे सन 2017 वर्षासाठी इयत्ता 6 वीच्या वर्गासाठी निवड परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले असून गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दि.16 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज सादर करावेत, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.टी. लाड यांनी दिली.
                सातारा जिल्ह्यातील शासनमान्य शाळेमध्ये विद्यार्थी इयत्ता 5 वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये शिकत असावा. प्रवेशावेळी विद्यार्थी 2016-17 सालासाठी उत्तीर्ण असला पाहिजे. ही अट सर्वांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मुलानांही लागू आहे. सन 2014-15, 2015-16, 2016-17 मध्ये विद्यार्थी तीसरी, चौथी व पाचवी अनुक्रमे खंड न पडता उत्तीर्ण झाला पाहिजे.
                अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी जागा राखीव आहेत. तसेच तृतीयपंथीय उमेदवारसुद्धा नवोदय विद्यालय निवड चाचणीत अर्ज करु शकतो. निवड चाचणीसाठी करावयाचा अर्जाचा नमुना जवाहर नवोदय विद्यालय शिक्षण विभाग तसेच प्रत्येक गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे उपलब्ध असून अर्ज 16 सप्टेंबर 2016 पर्यंत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावे, असेही श्री. लाड यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment