Wednesday, July 13, 2016

वैष्णवांचा मेळा वाखरी मुक्कामी लाखो नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा


पंढरपूर दिनांक 13 :-   भेटी लागे जीवा लागलिसे आस या अभंगाप्रमाणे लाखो वारकऱ्यांना आता सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. पंढरपूर पासून  जवळपास असलेल्या बाजीराव विहीर येथे आज माऊलींचे गोल व उभे रिंगण पार पडले. हा रिंगण सोहळा लाखो वारकरी भविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. संत तुकाराम महाराज  व माउलीची पालखी आज वाखरी येथे मुक्कामी आहे.
बाजीराव विहिर परिसरात विठ्ठल नामाचा गजरात समस्थ वारकरी  भक्ती रसात चिंब भिजला होता. आपल्या सावळ्या विठ्ठलाचे रुप पाहण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी अतुरलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. बाजीराव विहीर परिसरात माऊलीच्या दर्शनासाठी वारकरी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच  पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांचे हात आपसूक खाली जात होते.  पंढरीची वारी जयाचिया कुळी... त्याची पाय धुळ लागो मज  या संत वचनाप्रमाणे वारकऱ्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लागावी यासाठी भाविक अतुरेलाला होता.  हा रिंगण सोहळ्यानंतर संताच्या पालख्या वाखरी येथे  मुक्काम करुन हा वैष्णवांचा मेळा उद्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.
            या रिंगण सोहळ्यासाठी पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, अतिरीक्त पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, मोहोळचे तहसलिदार बी. आर माळी यांच्यासह परिसरातील मान्यवर तसेच संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील मानकरी, फडकरी, महाराज आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000




No comments:

Post a Comment