Tuesday, September 27, 2016

1 ऑक्टोबरला विक्रीकर दिन


सातारा, दि.27 (जिमाका) : शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी विक्रीकर दिन साजरा होणार असून या दिवसाचे औचित्य साधून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर सर्वात जास्त कराचा भरणा करणारे व्यवसायिक व उद्योजक यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती विक्रीकर उपआयुक्त शशांक जोशी यांनी दिली.
विक्रीकर दिनाच्या मुंबई येथील कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल, मुख्यमंत्री व अर्थमंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्व विक्रीकर कार्यालयात करण्यात येणार असून सातारा विक्रीकर विभागातील हा कार्यक्रम नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10.30 ते 2.00 या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत, असेही श्री.जोशी यांनी कळविले आहे.
00000



No comments:

Post a Comment