Monday, September 19, 2016

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन
सातारा, दि. 19 (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2016-17 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी व या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पिकांमध्ये पीक प्रात्यक्षिके राबविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन  देण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
या पीक स्पर्धेत प्रथम पारितोषिक 10 हजार, द्वितीय 7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये राहील. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान मधील प्रकल्प क्षेत्रातील सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पीक प्रात्यक्षिके राबविणाऱ्या शेतकऱ्यांनाच पीक स्पर्धेत भाग घेता येणार आहे. पीक स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 40 रुपये आहे. स्पर्धेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेसाठीचे अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. रब्बी हंगामातील (हरभरा) पीकस्पर्धेसाठी अर्ज भरण्याची अंतीम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे. पिक स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सहाय्यक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. शिंदे यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment