Monday, September 19, 2016

भरतीपुर्व प्रशिक्षण व निवड चाचणी कार्यक्रम


      सातारा दि.19(जि.मा.का):  6 फेब्रुवारी 2017 पासून सातारा, सोलापूर येथे होणारी सैन्य दलातील भरती लक्षात घेता, सातारा येथील करंजे नाका येथे मेस्को करिअर ॲकॅडमीतर्फे भरती प्रक्रियेतील मार्गदर्शन शिबीर व निवड चाचणी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत घेण्यात येणार आहे. व त्यानंतर दोन महिन्यांचे भरतीपुर्व प्रशिक्षण शिबीर चालविले जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल रा. रा. जाधव यांनी दिली.
                प्रशिक्षण, समाजाच्या सर्व स्तरावरील सर्व उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. ॲकॅडमीत मैदानी व लेखी परिक्षेच्या तयारीची तसेच राहण्याची आणि जेवणची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार, निवड चाचणीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता शैक्षणिक प्रमाण व गुणपत्रकांसह हजर राहून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. निवड चाचणीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता शैक्षणिक प्रमाण व गुणपत्रकांसह हजर राहून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. निवड चाचणीनंतर इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश दिलेल्या उमेदवारांनी प्रवेश शुल्क रक्कम रु.200/- त्वरीत भरुन शिबीरातील आपला प्रवेश निश्चित करावा. काही अपरिहार्य कारणामुळे जे उमेदवार निवड चाचणीसाठी हजर राहू शकत नाहीत ते मेस्को करिअर ॲकॅडमी, सातारा येथे जावून थेट प्रवेश घेवू शकतील. अधिक माहितीसाठी http://mescoltd.co.in या संकेतस्तळावर भेट द्यावी. किंवा सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत मोबाईल क्रमांक-9168986864 किंवा 9420697807 वर संपर्क साधावा, असेही श्री.जाधव यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment