Wednesday, September 28, 2016

अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थानी प्रस्ताव पाठवावेत


           सोलापूर दि. 28 : -  महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर पुरस्काराने  गौरविण्यात येते. 
             सन 2016-17   देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती अथवा संस्थांनी 15 ऑक्टोंबर 2016 पर्यंत अर्ज सादर करावेत. राज्यस्तरीय -    1 लाख, विभागीय – 25 हजार तर जिल्हास्तरीय – 10 हजार रुपये तसेच  स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
            इच्छुकांनी  विहीत नमुन्यतील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी 0217- 2310671 या दूरध्वनी क्रमांकावर त्याचबरोबर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 165 ए, रेल्वे लाईन, सुरवसे टॉवर्स, 4 था मजला, सोलापूर याठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नसल्याचे महिला व बाल विकास विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
                                                                   

No comments:

Post a Comment