Wednesday, September 21, 2016

44 व्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे आज उद्घाटन


                सातारा, दि.21 (जिमाका) : 44 व्या सातारा पोलीस क्रीडा स्पर्धा 2016 चे  येथील पोलीस परेड ग्राऊंडवर उद्या गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी  4 वाजता अंतरराष्ट्रीय धावपटू कु.चैत्राली गुजर हिच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
                 सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2016 रोजी 4 वाजता ऑलम्पिक धावपटू व अर्जुन पुरस्कार विजेती कु.ललिता बाबर हिच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न होणार आहे, असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment