Wednesday, September 21, 2016

अवैध दारूची तक्रार नोंदवा ‘व्हॉटस्अॅपवर’



पुणे दि. २१( विमाका) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूबाबत  व्हॉटस्अॅपवर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध केली असून नागरिकांनी  ८४२२००११३३ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर या संबंधीच्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एम. एस. वर्दे यांनी केले आहे.
संपूर्ण राज्याकरिता हा व्हॉटस्अॅप क्रमांक उपलब्ध असणार आहे. या क्रमांकावर केलेली नोंद  उत्पादन शुल्क (अंमलबजावणी व दक्षता ) आयुक्त  मुंबई यांच्याकडे होणार असून  वरिष्ठ पातळीवर तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. तक्रारकर्त्याची माहिती गोपनीय राहील, असेही श्री. वर्दे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment