Thursday, September 29, 2016

अन्न व औषध प्रशासन विभागमार्फत दिशाभूल करणाऱ्या खाद्य तेलाचा साठा जप्त


सोलापूर दि. 29 : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व नियम व नियमन 2011 नुसार अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूरमार्फत  दिशाभूल करणाऱ्या खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात  आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे मे. अडाणी विल्मर लि. कोंढी जि. सोलापूर या खद्यतेल/वनस्ती उत्पादन कंपनीच्या गोदामावर धाड टाकली असता  तेथे  फॉरच्युन राईस, ब्रान, फॉर्च्युन व्हिवो, ब्लेंडेड व्हेजिटेबल चा साठा विक्रीस ठेवल्याचे आढळले. खाद्य तेलाच्या पॅकेट्स वर दिशाभूल करणारा मजकूर जसे की, डायबेटीक कंट्रोल, कोलेस्टेरॉल लोअरिंग ऑईल, हार्ट फे्रंडली, सेल्सीयस ब्लड प्रेशर, अँटी कॅन्सर, प्रोटेक्शन अगेन्स्ट डीसीज असा मजकूर छापल्याचे दिसून आहे. हा मजकूर कायद्यांतर्गत तरतुदींचे उल्लंघन करीत असल्याने त्याचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येऊन उर्वरित रुपये 307740/ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
            या प्रकरणी उत्पादकास नोटीस पाठविण्यात आली असून त्यांचा खुलासा व नमुन्याचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सहायक आयुक्त (अन्न) सं.भा. नारागुडे यांनी कळविले आहे. तसेच सदर अन्न पदार्थाच्या उत्पादकांना  वृतपत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत नोटीस पाठविण्यात आली असून त्यांच्याकडूनही खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सहायक आयुक्त (अन्न) सं.भा. नारागुडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment