Wednesday, September 21, 2016

शस्त्र व जमावबंदी आदेश जारी


                सातारा, दि.21 (जिमाका) : सण, उत्सव,मराठा क्रांतीमोर्चा,पाणी, रस्त्याचा प्रश्न, शेतकरी व इतर संघटनांचे आंदोलने होण्याची शक्यता गृहित धरून जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे  यांनी मुंबई पोलीस  अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1)  (3) नुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यात दिनांक 30 सप्टेंबर 2016 पर्यंत  शस्त्रबंदी  जमावबंदी आदेश जारी केला आहे. 
                या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुऱ्या, काठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यारे किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिकरीतीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी मनाईचे उल्लघन करुन जर कोणताही इसम  अशी कोणतीही वस्तू बरोबर घेवून जाईल किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत सातारा जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. शांततेच्या मार्गांनी एकत्र येवून कार्यक्रम साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षक किंवा संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली असल्यास, यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य तसेच अंत्यविधी कार्यास हा जमावबंदी आदेश लागू होणार नाही, असेही सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment