Saturday, September 17, 2016

बँक ऑफ महाराष्ट्रचा 82 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


सातारा, दि. 17 (जिमाका) : जिल्हयाची अग्रणी बँक असलेल्या बँकेचा 82 वा वर्धापन दिन हॉटेल सुरुबन येथे  उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व स्वररजनी या हिंदी व मराठी गीतांनी झाली.
यावेळी सातारा अंचलचे प्रमुख अहिलाजी थोरात, मुख्यप्रबंधक रणजीत कुमार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, सिध्दार्थ कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सातारा अंचलचे प्रमुख अहिलाजी थोरात म्हणाले, 16 सप्टेंबर 1935 रोजी पुणे येथे मराठा चेम्बर्सच्या पदाधिका-यांनी सामान्य लोकासाठी बॅक ऑफ महाराष्ट्रची स्थापना केली. आज रोजी देशभरात बँकेच्या एकूण 1896 शाखा कार्यान्वित असून, ग्राहकांच्या सेवेसाठी 1868 एटीएम मशीन्स बसविलेले आहेत. बँकेने महा ई सिक्यूअर इंटरनेट सुविधा, ईएमव्ही, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड व्दारे फंड ट्रन्सफर बिल पेमेंट, टैक्स पेमेंट, ईएसबीटीआर, एमपोंस, एमयूपीआय आदी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुण दिल्या आहेत. बँकेने ग्राहकाभिमुख अनेक चांगल्या योजना सुरु केलेल्या असून त्यांचा लाभ बँकेचे कोटयावधी ग्राहक घेत आहेत.
यावेळी ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून टॉप गिअर ट्रांसमीशनचे व्यवस्थापक श्री. पवार यांनी  आपले मनोगत व्यक्त केले तर. सौ.भाग्यश्री भागवत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हयातील प्रतिष्ठित, व्यापारी, शेतकरी, ग्राहक, सर्व शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment